श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाची विविध आध्यात्मिक, उपासना मार्गदर्शक व आत्मचरित्रात्मक पुस्तकांची प्रकाशने उपलब्ध आहेत.
या पुस्तकांमधून उपासना, साधना, चिंतन आणि सद्गुरूंच्या विचारांचा अभ्यास करण्यासाठी अतिशय उपयुक्त मार्गदर्शन मिळते.
किंमत : ५ रुपये
रोजच्या व्यस्त जीवनात सुलभ आणि सोपी उपासना घडावी या उद्देशाने ८० ओव्यांनी बद्ध असलेले हे प्रभावी स्तोत्र प्रकाशित करण्यात आले आहे.
किंमत : १५ रुपये
रामनगर येथील मठ (गोविंदानंद श्रीराम मंदिर) तसेच श्री क्षेत्र नांदिवली येथील मठवास्तूत प्रति गुरुवारी होणाऱ्या आरत्या, मानसपूजा व तारकमंत्र यांचा समावेश असलेले उपयुक्त पुस्तक.
किंमत : ४० रुपये
२१ अध्यायी श्री विष्णू बळवंत थोरात रचित सुलभ आणि सोप्या मराठी भाषेतील ओवीरुपी पारायण प्रत असणारी पोथी.
सद्गुरू अण्णा व आईंना त्यांच्या सद्गुरूंच्या विचारातून ज्ञानाचा दिव्य स्रोत लाभला.
प.पू. अण्णा व आई यांच्या विचारप्रणालीतून जनमानसांच्या चिंतनासाठी उपयुक्त कथानके, विवेचन आणि प्रवचने या पुस्तकात वाचायला मिळतात.
किंमत : १८० रुपये (२ खंडात)
लक्ष्मीस्वरूप सौ. सुषमा भालचंद्र लिमये (आई) यांच्या संपूर्ण जीवनपटावर आधारित उपासना मार्ग दाखवणारे हे आत्मचरित्र.
किंमत : ४०० रुपये (२ खंडात)
जीवनातील आधिभौतिक दुःखातून मुक्त होऊन परमानंदाची प्राप्ती व्हावी, या हेतूने सामान्य अभ्यासक आणि परमभक्तांसाठी मार्गदर्शक ठरणारे चैतन्यस्वरूप अण्णांचे हे आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आले आहे.
या दोन खंडांमधून स्वानंद आणि उपासनेचा सखोल अनुभव मिळतो.
किंमत : १२५ रुपये
ध्यान, धारणा, प्रत्याहार, प्राणायाम आणि योगाभ्यास या विषयांवर उपासनेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या मूळ प्रतींमधून निवडक विवेचन पुस्तिका प्रकाशित करण्यात आल्या आहेत.
“सद्गुरूंची चरणसेवा” या मूळ प्रतीचा अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरते.
किंमत : ९० रुपये
नंदकिशोर संस्कार केंद्र, डोंबिवली पूर्व येथील बालकांसाठी तसेच इतर मुलांसाठी रोजच्या परिपाठाकरिता अनेक स्तोत्रांनी सजलेले हे पुस्तक तयार करण्यात आले आहे.
लहान मुलांना वाढदिवस भेट किंवा मौजीबंधन भेट म्हणून देण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.